कल्कि पुराण हा कल्कि नावाच्या विष्णूच्या दहाव्या अवताराशी संबंधित एक वैष्णव संप्रदायातील हिंदू ग्रंथ आहे.[१] ढाका येथे १७२६ मधील सापडलेल्या हस्तलिखितावरून हे पुराण इ.स. १५०० ते १८०० दरम्यान केव्हातरी बांग्लादेशात प्रथम लिहिल्या गेल्याचे मानले जाते. तेव्हा या प्रदेशावर बंगाल सल्तनत किंवा मुघल साम्राज्याचे राज्य होते.[१][२]
याची गणना १८ महा-पुराणात होत नाही. याला एक उपपुराण किंवा दुय्यम पुराण म्हणून गणले जाते. यातील मजकूर अनेक आवृत्त्यांमध्ये अस्तित्वात आहे, ज्याची रचना आणि तपशील भिन्न आहेत..[३]
कल्की अवतार हा भगवान विष्णूचा दहावा आणि अंतिम अवतार आहे. कलियुगाच्या शेवटी कल्की पृथ्वीवर जन्म घेईल जेव्हा खूप अधर्म असेल, पापी लोक अस्तिल. पापी आणि अधर्म असलेल्या सर्व लोकांचा नाश करण्यासाठी आणि कालचक्रमध्ये पुन्हा सत्ययुग सुरू करण्यासाठी, कलीचा नाश करण्यासाठी जन्म घेईल. कली हा एक राक्षस आहे जो सर्वात शक्तिशाली राक्षसांपैकी एक आहे, तो अत्यंत क्रूर आहे आणि त्याला संपूर्ण जगावर राज्य करायचे आहे त्यासाठी तो काहीही करू शकतो, त्याला थांबवन्या साठी, त्याचा नाश कर्ण्यसाठी, कल्की आणि सात चिरंजीवी एकत्र येउन आणि त्याच्याशी युद्ध करतील आणि त्याचा पराभव करतील.
संदर्भ