प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.
लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा
ओझोन हा वायू मुळात प्राणवायूचे संयुग आहे. ओझोन हा प्राणवायूच्या ३ अणूंपासून बनलेला असून त्याचे रेणुसूत्र O3 असे आहे. शास्त्रीय दृष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतीनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.
पदार्थ-वैज्ञानिक बाह्य गुण
ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायू असून, पाण्यात किंचित प्रमाणत विरघळतो. कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम अध्वृवीय द्रावक यात जास्त विरघळून एक निळे द्रावण तयार करतो. -११२० तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे, कारण वायुरुप व तरल ओझोन मिळून स्फोट होउ शकतो. -१९३०तापमानावर, त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.[१]
बहुतेक लोक ०.०१ पी.पी.एम. इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायू ओळखू शकतात कारण त्यास असलेला क्लोरीनसदृष्य तीव्र वास हा होय. त्याच्या ०.१ ते १ पी.पी.एम. एवढ्या हवेतील तीव्रतेने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ व श्वसनसंस्थेची जळजळ, इत्यादी विकार उद्भवू शकतात.
[२]
कमी पातळीच्या असण्यानेसुद्धा प्लॅस्टिक, फुप्फुस इत्यादींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ओझोन हा वायू चुंबकीय क्षेत्रास विरोध करणारा आहे. एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर, तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो.
इतिहास
१७८५मध्ये वॉन मारेमने इलेक्ट्रिक डिस्चार्ज उपकरणांजवळ एक विशेष प्रकारचा गंध अनुभवला, ज्याचा त्यांनी त्यांच्या लेखनात उल्लेख केला आहे. १८०१मध्ये, क्रिक शँकला ऑक्सिजनमध्ये विसर्जित करताना असाच अनुभव आला. १८४०मध्ये शानबीनने या गंधाचे श्रेय एका नवीन वायूला दिले आणि त्याने ग्रीक शब्द ओझोच्या आधारे त्याला ओझोन असे नाव दिले, ज्याचा अर्थ मला वास येतो. १८६५मध्ये सोरेटने हे सिद्ध केले की हा वायू ऑक्सिजनचा ऍलोट्रोप आहे आणि त्याचे आण्विक सूत्र O3 आहे.