एज ऑफ एम्पायर्स (इंग्लिश: Age of Empires) हा मायक्रोसॉफ्टने तयार केलेला एक संगणक खेळ आहे. सर्वात पहिला खेळ १९९७ साली विक्रीकरिता खुला केला गेला. तेव्हापासून एज ऑफ एम्पायर्सचे सात भाग विकसित करण्यात आले आहेत.
समयोचित डावपेच (रियल-टाइम स्ट्रॅटेजी) वापरून खेळला जाणारा एज ऑफ एम्पायर्स खेळ जगाच्या इतिहासातील पाषाणयुग, लोहयुग, मध्ययुग इत्यादी कालखंडांमधील वसाहती विस्तारांवर आधारित आहे. हा खेळ आजवर बनवल्या गेलेल्या सर्वोत्तम समयोचित डावपेच खेळांपैकी एक मानला जातो. मायक्रोसॉफ्टने आजवर ह्या खेळांच्या एकूण अंदाजे २ कोटी प्रती विकल्या आहेत.
भाग
एज ऑफ एंपायर्सचे खालील ८ वेगवेगळे भाग प्रकाशित झाले आहेत.
एज ऑफ एम्पायर्स (११९७)
एज ऑफ एम्पायर्स - द राईज ऑफ रोम (१९९८)
एज ऑफ एम्पायर्स २ - द एज ऑफ किंग्ज (१९९९)
एज ऑफ एम्पायर्स २ - द कॉंकरर्स (२०००)
एज ऑफ एम्पायर्स ३ (२००५)
एज ऑफ एम्पायर्स ३ - द वॉरचीफ्स (२००६)
एज ऑफ एम्पायर्स ३ - द एशियन डायनेस्टीज (२००८)
एज ऑफ एम्पायर्स ऑनलाईन (१६ ऑगस्ट २०११)
वरील सर्व भागांना ८० टक्के पेक्षा अधिक समीक्षकांनी पसंती दाखवली आहे.