हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी (१६ डिसेंबर, १९५९:हरदनहळ्ळी, हासन जिल्हा, कर्नाटक[१] - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे २००६-७ दरम्यान कर्नाटकचे १८वे मुख्यमंत्री होते. हे कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी कन्नड चित्रपटांचे निर्माता आणि वितरक आहेत.[२]
कौटुंबिक माहिती
कुमारस्वामीचे वडील एच.डी. देवेगौडा भारताचे भूतपूर्व पंतप्रधान आहेत. कुमारस्वामी यांना त्यांची पत्नी अनितापासून निखिल नावाचा मुलगा आहे.[३] निखिल कन्नड चित्रपट अभिनेता आहे. कुमारस्वामी यांना कन्नड आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री राधिकापासून शमिका नावाची मुलगी आहे.[४]
संदर्भ आणि नोंदी