tejido (es); Vefur (is); ٹِشوٗ (ks); tisu (ms); ووب (ps); doku (tr); نسیج (ur); Tkanivo (sk); тканина (uk); Dokumalar (tk); 生物组织 (zh-cn); Gewebe (gsw); Toʻqima (uz); Ұлпа (kk); ткиво (mk); tkivo (bs); tissu biologique (fr); tkivo (hr); उती (mr); Tissu (frp); ткиво (sr); Biologeschen Tissu (lb); vev (nb); toxuma (az); kođos (smn); نسيج حيوي (ar); တစ်ရှူး (my); 生物組織 (yue); Ткандар (ky); Texíu (ast); teixit (ca); Gewebe (de-ch); meinwe (cy); ind (sq); Ткиво (биологија) (sr-ec); 生物組織 (zh); væv (da); ქსოვილი (ka); 組織 (ja); texito (ia); සිංහල (si); Textum (la); ऊतक (hi); 組織 (wuu); kudos (fi); Texhou (wa); koođõs (sms); இழையம் (ta); тканка (be-tarask); биологик тукыма (tt-cyrl); Kudeh (vep); เนื้อเยื่อ (th); Tkivo (sh); Tesùo (vec); တစ်ရှုး (rki); Tzayanatl (nah); Tisyu (bcl); Тъкан (bg); Țesut (ro); Tavy (mg); vävnad (sv); Бофта (tg); Tisuo (io); ເນື້ອເຍື່ອ (ຊີວະວິທະຍາ) (lo); 조직 (ko); histo (eo); Teixito (an); কলা (bn); Jaringan (jv); تيسو (ms-arab); געוועב (yi); mô (vi); audi (lv); Weefsel (af); tecido (pt-br); tissue (sco); Эд (mn); vev (nn); Jaringan (min); ಸಸ್ಯ ಅಂಗಾಂಶ (kn); شانە (ckb); tissue (en); szövet (hu); ehun (eu); توخوما (azb); Kawsaykuq tantalli (qu); Gewebe (de); Хьесий (биологи) (ce); тканка (be); şane (ku); तन्तु (ne); Gewebe (de-at); Tishuu (om); רקמת תאים (he); биологик тукыма (tt); కణజాలము (te); gođus (se); fíochán (ga); ιστός (el); Geweev (nds); tessuto (it); Cho͘-chit (nan); audinys (lt); Tisyu (ceb); kude (et); ਪੁਲੰਦਾ (pa); şane (ku-latn); Тĕртĕм (cv); tkanka (pl); ẹ̀ya-ara (yo); Jaringan (id); tecido (pt); Histun (vo); بافت (fa); I-tissue (xh); तन्तु (new); tkivo (sl); Tisyu (tl); teissut (oc); 生物組織 (zh-hant); Tisyu (war); Tishu (sw); കലകൾ (ml); weefsel (nl); কলা (জীৱ বিজ্ঞান) (as); tkáň (cs); اوڄو يا تاندورو (sd); ткань (ru); tecido (gl); Туҡыма (ba); 生物组织 (zh-hans); Հյուսվածք (hy) ဆဲလ် တစ်မျိုး (my); zelulen eta organoen arteko antolaketa-zelularra (eu); система клеток и межклеточного вещества, объединённых общими (схожими) функциями. (ru); Ansammlung gleichartig oder unterschiedlich differenzierter Zellen einschließlich ihrer extrazellulären Matrix (de-ch); Ansammlung gleichartig oder unterschiedlich differenzierter Zellen einschließlich ihrer extrazellulären Matrix (de); Група ћелија сличног изгледа која обавља исту функцију (sr-ec); 細胞和完整生物體之間的細胞組織水平; 使用通用功能組合在一起的單元格 (zh); Koma xeneyên hevkar. Laşê mirov çar cure şane lixwe digire (ku); bitki, hayvan ve insan organlarını meydana getiren, şekil ve yapı bakımından benzer olup, aynı vazifeyi gören, birbirleriyle sıkı alâkaları olan aynı kökten gelen hücrelerin topluluğu (tr); 細胞が集まってでき、まとまった役割をなすもの (ja); Ansammlung gleichartig oder unterschiedlich differenzierter Zellen einschließlich ihrer extrazellulären Matrix (de-at); сукупність клітин, спільного походження, що разом виконують спільну функцію (uk); कोशिकाओं का समूह (hi); 생물학에서 세포가 모여 이루는 단위 (ko); insieme di cellule, strutturalmente simili, associate per funzione (it); টিস্যু ও এর প্রকারভেদ নিয়ে আলোচনা (bn); niveau d'organisation intermédiaire entre les cellules et les organes (fr); समान स्वरूप असलेल्या आणि समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह ऊतक म्हणून ओळखला जातो (mr); nível organizacional celular intermediário entre as células e um organismo completo; células que são agrupadas com uma função comum (pt); Група ћелија сличног изгледа која обавља исту функцију (sr); skupek istovrstnih diferenciranih celic (sl); nível organizacional celular intermediário entre as células e um organismo completo; células que são agrupadas com uma função comum (pt-br); conjunto de células, estructuralmente similares, asociadas por funciones (es); مجموعهای از سلولهای مشابه با وظایف مشخص (fa); organització cel·lular intermèdia entre les cèl·lules i un organisme (ca); en gruppe celler i en flercellet organisme som har en enhetlig funksjon (nb); groep cellen met een bepaalde functie (nl); cellular organizational level intermediate between cells and a complete organism; cells that are grouped together with a common function (en); samankaltaisten solujen joukko (fi); componenta a corpului (ro); koma xaneyên hevkar (ku-latn); conxunto de células, estructuralmente similares, asociadas por funcións (gl); مجموعة خلايا متشابهة ومتآلفة ذات وظيفة مشتركة (ar); σύνολο ομοειδών μορφολογικά κυττάρων που επιτελούν την ίδια λειτουργία (el); צבר תאים וחומרים בין-תאיים בעלי מוצא, תפקוד ומבנה משותפים ותפקוד משותף (he) တစ်သျှူး(ခန္ဓာဗေဒ), တစ်ရှုး (my); testszövet (hu); ٹشِوٗ (ks); тиссью, живая ткань, биологическая ткань, ткань (биология) (ru); Zellgewebe (de-ch); Zellgewebe (de); Inde, Ind, Indet shtazore (sq); 組織, 身體組織, 生命組織, 组织, 组织 (生物学) (zh); vævsdele (da); dokular (tr); 体組織 (ja); Zellgewebe (de-at); vävnaderna, vävnader, vävnaden (sv); Тканини, Основні тканини рослин (uk); тукыма, биологик тукымалар (tt); 組織 (zh-hant); उत्तक (hi); కణజాలాలు, కణజాలం (te); kudokset (fi); Buněčná tkáň, Tkáně (cs); திசு (ta); Tissutale, Tessuti biologici, Tessuto biologico, Materia vivente (it); tissu, tissu organique, tissu humain (fr); تيسو بيولوݢي (ms-arab); רקמה, רקמות, ריקמה, ריקמת תאים (he); тукыма, биологик тукымалар (tt-cyrl); Tesuo (vec); ביאלאגישער טישו, ביאלאגישע טישו (yi); ẹ̀ya-ara ènìyàn, ẹ̀ya-ara ẹran, ẹ̀ya-ara ẹranko, ẹ̀ya-ara ọ̀gbìn, ẹ̀ya-ara ohun abẹ̀mín (yo); Tkiva (hr); tecido biológico, tecido orgânico (pt); tecido biolóxico (gl); Audu veidi (lv); tisu biologi (ms); Ткива (sr); mô sinh học (vi); Lamuymoy, Biological tissue, Mga tisyu, Tisyung biyolohikal, Pambiyolohiyang tisyu, Biolohikal na tisyu, Himaymay, Biyolohikong tisyu, Biyolohikal na tissue, Biyolohikal na tisyu, Tisyung pambiyolohiya, Biolohikong tisyu (tl); tecido biológico, tecido orgânico (pt-br); Tkiva, Ткива, Ткиво (sh); Tissu, Geweebe (lb); cellevev, kroppsvev, textus (nn); biologisk vev, cellevev (nb); lichaamsweefsel, orgaanweefsel (nl); tejido celular, tejido biológico, tejido orgánico, tejido biologico, tejidos celulares, tejidos (es); نسائج, نسیجات, بافتیں, نسیجوں, Tissue, نسیجی, انسجہ, ٹشو, بافت (ur); teixit biològic (ca); Tesuturi, Ţesut, Țesuturi, Ţesuturi (ro); tissues, biological tissue (en); نسيج خلوي, نسيج عضوي (ar); 组织 (zh-hans); 组织 (zh-cn)
उती समान स्वरूप असलेल्या आणि समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह ऊतक म्हणून ओळखला जातो Периферичний нерв, переріз |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
प्रकार | anatomical structure class type, class of anatomical entity |
---|
उपवर्ग | multicellular structure, anatomical structure, biogenic substance, biological material |
---|
ह्याचा भाग | organ |
---|
पासून वेगळे आहे | - Indi (indi, descriptive page and disambiguation page have to be in different items)
- Vev (vev, descriptive page and disambiguation page have to be in different items)
- cloth
|
---|
|
|
|
ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात. ऊती हे समान मूळ असलेले पेशीने बनलेले असतात, जे एकत्रितपणे एक विशिष्ट कार्य करतात. अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती एकत्र काम करतात.
सर्व सजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येऊन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येऊन अवयव संस्था तयार होते. उदा.श्वसनसंस्था,पचनसंस्था इत्यादी.या
पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.
प्राण्यांचे ऊती
प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात:
अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.
अभिस्तर उती :
अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात.
अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत:
- सरल पटट्की अभिस्तर
- स्तरीत पटट्की अभिस्तर
- स्तम्भीय अभिस्तर
- रोमक स्तम्भीय अभिस्तर
- घनाभरूप अभिस्तर
- ग्रंथिल अभिस्तर
संयोजी उती :
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:
- -अस्थी
- -रक्त
- -अस्थिबंध
- -स्नायुरज्जू
- -कास्थी
- -विरल उती
- -चरबीयुक्त उती
स्नायू उती :
स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.
चेता उती :
सर्व पेशींमध्ये चेतना क्षमता आढळते. या उती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.
वनस्पती ऊती
वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत :
साध्या ऊती व संयुक्त ऊती
बहुपेशीय सजीवांमधील समान संरचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशीसमूहाला ऊती (ऊतक) असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वनस्पती ऊतींचे ऊतिकर / विभाजी ऊती (Meristems) व स्थायी ऊती (Permanent tissues) असे दोन मुख्य प्रकार मानले जातात. विकासाची अवस्था ध्यानी घेऊन सतत विभाजन करीत असणाऱ्या घटकांना विभाजी आणि विभाजनाची क्रिया थांबून (तात्पुरती बंद होऊन) प्रभेदन पूर्ण झालेल्या घटकांना स्थायी अशी संज्ञा वापरतात.
ऊतिकर / विभाजी ऊती : वनस्पतींची वृद्धी (वाढ) विशिष्ट ठिकाणी स्थित मृदुकाय पेशींपासून होते. या ऊतींतील काही पेशींची काही वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे या पेशी त्वरित ओळखता येतात. अशा सर्व पेशी अप्रौढ असून त्यांच्यात सतत विभाजन होत असते. या पेशी गोलाकार, दंडगोलाकार किंवा बहुभूज असतात. अशा सजीव पेशीभोवती पेशीभित्ती पातळ असते. या पेशी पेशीद्रव्याने भरलेल्या असतात. प्रत्येक पेशीत प्रामुख्याने केंद्रक असते. या पेशीसमूहात आंतरपेशीय पोकळ्या नसतात. ही एकच अशी ऊती आहे की, ज्यात पेशीविभाजनाने नवीन पेशींची निर्मिती होते. अशा पेशीसमूहाला ऊतिकर (विभाजी ऊती) म्हणतात. १८५७ मध्ये कार्ल व्हिल्हेल्म फोन नेअगेली यांनी सर्वप्रथम मेरीस्टेम हा शब्दप्रयोग यासाठी वापरला. त्यांनी विभाजी (वनस्पतीच्या वाढीस जबाबदार असणाऱ्या कोशिका) आणि स्थायी (कायम झालेल्या) ऊतींतील भेद स्पष्ट केला.
ऊतिकर खोड व मूळ यांच्या अग्रभागी आढळतात. याशिवाय सपुष्प वनस्पतीत आढळणारे वाहिनी (संवाहिनी) ऊतिकर व त्वक्षाकर यांचाही ऊतिकरात समावेश होतो.ऊतिकरातील पेशी सतत विभाजित होत असतात. नवनिर्मित पेशी हळूहळू वाढीस लागून मोठ्या होतात. पेशीविभाजनाने त्यापासून निरनिराळ्या स्थायी पेशी तयार होतात. अशा प्रकारे ऊतिकरांपासून विशिष्ट प्रकारच्या अनेक पेशी व ऊती निर्माण होतात.
ऊतिकरांचे (विभाजी ऊतींचे) वर्गीकरण: ऊतिकरांच्या वर्गीकरणाकरिता निरनिराळ्या पद्धती मानण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
ऊतिकरांचे (विभाजी ऊतींचे) वर्गीकरण
|
( अ) विकास अवस्थेनुसार
|
(आ ) उद्गमनानुसार
|
( इ ) वनस्पतीतील स्थानानुरूप
|
( ई ) कार्यानुरूप
|
( उ ) विभाजीय प्रतल स्तरानुसार
|
१
|
पूर्वऊतिकर (प्रोमेरीस्टेम)
|
१. प्राथमिक ऊतिकर
|
१. अग्रस्थ ऊतिकर
|
१. आद्यत्वचा (प्रोटोडर्म)
|
१. वक्रपट्टीय ऊतिकर
|
२. द्वितियक ऊतिकर
|
२. मध्यस्थित ऊतिकर
|
२. आद्य ऊतिकर
|
२. पुंजकीय ऊतिकर
|
३. पार्श्विक ऊतिकर
|
३. आधार ऊतिकर
|
३. पट्टिका ऊतिकर
|
( अ) पेशींच्या विकास अवस्थेवर अवलंबून असलेले वर्गीकरण :
पूर्वऊतिकर (Promeristem) : वनस्पतीच्या शरीरात जेथेजेथे नवीन वाढ (वृद्धी) होत असते अशा भागात पूर्वऊतिकर आढळते. या भागात ऊतिकर व त्यापासून नवनिर्मित पेशींचा अंतर्भाव होतो.
(आ ) ऊतिकर उद्गमनावर अवलंबून असणारे वर्गीकरण :
(१) प्राथमिक ऊतिकर : हे ऊतिकर वनस्पतीच्या भ्रूणीय अवस्थेपासून सुस्पष्ट असतात किंवा भ्रूणीय पेशींचे ते वारस असतात. खोड, मूळ व इतर उपांगांच्या अग्रभागी प्राथमिक ऊतिकर आढळतात. यांना प्रोमेरीस्टेमचा भाग मानतात. वनस्पती प्राथमिक ऊतिकरांपासून निर्माण होते.
(२ ) द्वितीयक ऊतिकर : वनस्पतींच्या काही अवयवांत कालांतराने उदभवणारे ऊतिकर म्हणजे द्वितीयक ऊतिकर होय. यांची उत्पत्ती स्थायी ऊतींपासून होत असल्याने त्यांना द्वितीयक ऊतिकर असे म्हणतात. यांची उत्पत्ती खोड व मूळ यांत पार्श्व बाजूस होते. यामुळे वनस्पतीच्या शरीरात द्वितीयक वृद्धी होते. स्तंभ व मुळांची जाडी वाढते. उदा. त्वक्षाकर ऊतिकर, काग एधी.
( इ ) ऊतिकरांच्या वनस्पतीतील स्थानावर अवलंबून असणारे वर्गीकरण :
(१) अग्रस्थ ऊतिकर (प्ररोह विभाजी ऊती) : (Apical meristem) वाहिनीवृंत वनस्पतीत अग्रस्थ ऊतिकर खोड, मूळ व त्यांच्या शाखा यांच्या अग्रभागी आढळतात. त्यांना वर्धन बिंदू असेही संबोधतात. या ऊतिकरांमुळे खोड, फांद्या, मुळे यांची लांबी वाढते. अग्रस्थ ऊतिकरांत एक अथवा अनेक आरंभिक (initiating cells) पेशी असतात. इक्विसिटम, सायलोटम, नेचे इ. वनस्पतीत एकच अग्रस्थ पेशी असते. परंतु सपुष्प वनस्पतींमध्ये मात्र अनेक पेशी आढळतात. त्या अग्रस्थ किंवा उपाग्रस्थ (terminal or sub-terminal) पेशी असतात. वनस्पतींचे प्राथमिक शरीर अग्रस्थ ऊतिकरांपासून तयार झालेल्या स्थायी ऊतींपासून बनलेले असते.
(२ ) मध्यस्थित ऊतिकर (अंतरीय विभाजी ऊती) (Intercalary meristem) : हा अग्रस्थ ऊतिकराचाच एक भाग असतो, परंतु काही वनस्पतीत अक्षवृधी होत असताना अग्रस्थ ऊतीत स्थायी पेशी तयार झाल्यामुळे त्यांचा काही भाग टोकापासून अलग होतो. अशा प्रकारे अग्रस्थ ऊतिकरांचा काही भाग त्यापासून अलग होतो त्यांस मध्यस्थित ऊतिकर असे संबोधतात. मध्यस्थित ऊतिकर दोन पर्णांच्या मधे आढळतो आणि त्याच्या खाली व वर स्थायी ऊती आढळतात. अशा ऊती अल्पजीवी असतात; कालांतराने त्यांचे स्थायी ऊतीत रूपांतर होते.
( ३ ) पार्श्विक ऊतिकर (lateral meristem) : प्रकट बीज व द्विदल बीज सपुष्प वनस्पतींच्या अवयवात या प्रकारचे ऊतिकर आढळतात. यांच्या खोड व मूळ यांत पार्श्वबाजूला किंवा कडेच्या भागात हे ऊतिकर निर्माण होतात. यातील आरंभिक पेशी विशिष्ट प्रकारे विभाजित होतात. या विभाजनात नवनिर्मित पेशीभित्तिका बाह्यांगाला समांतर असतात (periclinal). या पेशींच्या विभाजनाने त्यांच्या आतील व बाहेरील भागास नवीन स्थायी पेशी तयार होतात. त्यांच्यामुळे वनस्पतीत द्वितीयक वृद्धी घडून येते व मूळ व खोड यांची जाडी वाढते. उदा. वाहिनी (संवाहिनी) ऊतिकर व त्वक्षाकर ऊतिकर.
( ई ) कार्यानुरूप ऊतिकर : १८९० मध्ये गोटलीप हाबरलांट यांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे ऊतिकरांचे वर्गीकरण त्यांच्या कार्यावर अवलंबून होते. स्तंभ व मूळ यांच्या अग्रभागी असलेल्या ऊतिकरांत प्रामुख्याने तीन स्पष्ट वेगवेगळ्या ऊती दिसतात असे त्यांनी दाखविले.
(१) आद्य त्वचा : (Protoderm) यापासून अधिचर्म ऊती निर्माण होते.
(२ ) पूर्वोतिकर : (Procambium) यापासून प्राथमिक संवाहिक ऊती व मौलिक ऊती निर्माण होतात. मौलिक ऊतकांमध्ये कालांतराने अधिस्त्वचा, वल्कुट, अन्तस्त्वचा, परिरंभ व गाभा इ. प्राविभेदीत होतात.
( ३ ) आधार ऊतिकर (Ground meristem).
( उ ) विभाजीय प्रतल स्तरानुसार (plane of division) :
(१) वक्रपट्टीय ऊतिकर : या ऊतीकरातील पेशी फक्त एकाच प्रतलात विभागतात. उदा. तंतुमय शेवाळ.
(२ ) पुंजकीय ऊतिकर : या ऊतीकरातील पेशी सर्व दिशेतील प्रतलात विभागतात त्यामुळे आकारमान वाढते. ह्या ऊतीकर वल्कुट व गाभ्यात दिसून येतात.
( ३ ) पट्टिका ऊतिकर : या ऊतीकरातील पेशी दोन दिशांतील प्रतलात विभागतात. यामुळे अवयवाचे क्षेत्रफळ वाढते. उदा., पाने.
बाह्य दुवे