उमेश विनायक कुलकर्णी (डिसेंबर ६, १९७६ - हयात) हा मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे.
कारकीर्द
उमेश विनायक कुलकर्णी ह्यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ला पुणे (महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी पुणे येथील ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. २०००ला त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था पुणे (एफ टी आय आय ) येथे दिग्दर्शन पदवीसाठी प्रवेश घेतला. सुरुवाती पासूनच चित्रपटाची आवड असणाऱ्या उमेश कुलकर्णी ह्यांनी आपल्या अभ्यासा निमित्ताने बरेच लघु चित्रपट तयार केले जे बऱ्याच अंतरराष्ट्रीय महोत्सवास कौतुकास पात्र ठरले.