उमा आनंद चक्रवर्ती

डॉ. उमा चक्रवर्ती (जन्म: २० ऑगस्ट १९४१[ दुजोरा हवा] - हयात) या लेखिका, इतिहासकार, माजी प्राध्यापिका आणि दिल्ली येथील स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत.

बालपण, शिक्षण आणि व्यक्तीगत जीवन

त्यांचे शिक्षण दिल्ली व बंगळुरू येथे झाले.[] त्यांच्या आईचे नाव सरस्वथी होते. त्यांच्या वडलांचे नाव 'पालघाट एस. दोराईस्वामी' होते.'पालघाट एस. दोराईस्वामी' ब्रिटिश सरकार मध्ये दिल्ली आणि सिमला येथे अंडर सेक्रेटरी या हुद्यावर होते. त्यांचे आजोबा मूळचे तंजावरचे तेथून पालघाट केरळ व पालघाट केरळ येथून त्यांचे वडील १९२४ साली उत्तर भारतातस्थानांतरित झाले होते. [ दुजोरा हवा] त्यांचे कुटूंब (पालक) स्त्री शिक्षणाचे आणि दृष्टीकोणाचे महत्त्व जाणणारे सुधारणावादी होते.

त्यांनी बेंगलोर येथून कायद्याची पदवी मिळवली आणि बनारस हिंदू विद्यापीठ वाराणशी येथून इतिहास हा विषय घेऊन पोस्ट ग्रॅज्यूएशन केले. वाराणशी गांधीवादी संस्था येथेच त्यांचा त्यांचे भावी पती डॉ. आनंद चक्रवर्ती यांच्याशी परिचय होऊन विवाह झाला. त्यांचे पती आनंद चक्रवर्ती यांच्या सोबतही विविध सामाजिक उपक्रमात उमा आनंद चक्रवर्ती यांनी सहभाग घेतला. उमा आणि आनंद चक्रवर्ती यांना दोन मुले असून मुलगा सिद्धार्थ आणि उपाली असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. उमा चक्रवर्ती निवृत्ती नंतर त्यांचे पती आनंद चक्रवर्ती यांच्या समवेत दिल्ली येथे स्थायिक आहेत.[ दुजोरा हवा]

कारकीर्द

उमा चक्रवर्ती या मिरांडा हाउस महिला महाविद्यालयामध्ये इ.स. १९६६ ते २००८ [काळ सुसंगतता?] या काळात प्राध्यापक होत्या. लाहोर येथील स्त्री-अभ्यास संस्थेत त्या पाहुण्या प्राध्यापक आहेत.[] १९८० च्या दशका पासून त्यांनी इतिहासाची स्त्रीवादी चिकित्सा करण्यास सुरुवात केली [ दुजोरा हवा]

लेखन आणि संशोधन

त्यांनी जातीच्या प्रश्नावर,श्रम आणि लिंगभाव यावर अध्ययन आणि लिखाण केले आहे त्याचबरोबर त्या लोकशाही आणि स्त्री चळवळीमध्ये कार्यरत आहेत. त्या स्त्री-अभ्यासातील एक् नामवंत अभ्यासक आणि विचारवंत आहेत. त्यांनी इतिहासाचे लिंगभाव परिप्रेक्ष्यातून चिकीत्सा करणारी अत्यंत महत्त्वाची अनेक पुस्तके लिहिली आहेत. उमा चक्रवर्ती यांची 'ब्राम्हणी पुरुषसत्ते' संदर्भातील मांडणी मूलभूत मानली जाते.

त्यांनी लिहिलेली पुस्तके (सर्व इंग्रजी भाषेत)

पुरस्कार

जे. पी. नाईक विशेष व्यक्ती पुरस्कार मिळाला.[]

संदर्भ

  1. ^ a b c "Loksatta.com". www.loksatta.com. 2009-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-15 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!