कल्पित साध्य अथवा विधानाचा दुसरा अर्धा भाग म्हणे उत्तरपद होय.सर्वसाधारण विधान अथवा प्रतिपादनात 'तर' नंतर येणारा विधानाचा भाग हा उत्तरपद असतो.जर ' अ असेल तर ब असते ' वाक्यात ' ब असते ' हे उत्तरपद तर ' अ असेल ' हे पुर्वपद होय.
उदाहरणे
- वाक्यात ' ब असते ' हे उत्तरपद तर ' अ असेल ' हे पुर्वपद होय.
- जर "क्ष" सस्तन असेल तर "क्ष" प्राणी असेल .
- तर "क्ष" प्राणी असेल हे उत्तरपद होय
- जर संगणक विचार करतात , तर ते सजीव असतात
- तर ते सजीव असतात हे उत्तरपद होय.
- कल्पित साध्यातील उत्तरपद हे पुर्वपदाचा परिणाम असतेच असे नाही.
- माकडे जांभळी आहेत , तर मासे फ्रेंच बोलतात.
- तर मासे फ्रेंच बोलतात 'हे उत्तरपद होय.
- इथे उतरपद हा पुर्वपदाचा परिणाम असेलच असे नाही एवढेच नव्हे तर पुर्वपदातील दाव्याचा आणि उत्तरपदाशी काही संबंध असेलच असेही नाही.जर माकडे जांभळी आहेत दाव्याचा तर मासे फ्रेंच बोलतात या उत्तरपदाशी काही संबंध असतोच असे नाही.