इंग्लिश महिला क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये भारताचा दौरा केला होता. ते भारताकडून ५ एकदिवसीय सामने आणि १ कसोटी सामना खेळले. भारताने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, तर कसोटी सामना अनिर्णित राहिला.[१][२]
भारतीय महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला गुरु नानक कॉलेज ग्राउंड, चेन्नई पंच: कुट्टीकोड मुरली (भारत) आणि जी. ए. प्रतापकुमार (भारत) सामनावीर: नीतू डेव्हिड (भारत)
भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
मॅंडी गोडलीमन (इंग्लंड), झुलन गोस्वामी आणि जया शर्मा (भारत) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.
भारतीय महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला मिडल इन्कम ग्रुप क्लब ग्राउंड, मुंबई पंच: बी. जमुला (भारत) आणि वि. एम. गुप्ते (भारत) सामनावीर: अंजुम चोप्रा (भारत)
इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अमृता शिंदे (भारत) हिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
सामना अनिर्णित के. डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ पंच: राजन सेठ (भारत) आणि एस. के. बन्सल (भारत) सामनावीर: हेमलता काला (भारत)
इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
जॅकी हॉकर, हेलन वॉर्डलॉ (इंग्लंड), झुलन गोस्वामी, बिंदेश्वरी गोयल, अरुंधती किरकिरे, ममता माबेन, मिताली राज आणि अमृता शिंदे (भारत) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.