आर्णी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. आर्णी हे अरुणावती नदीच्या काठी वसलेले गाव आहे, याच ठिकाणी एका सूफी संत बाबा कंबलपोषचा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.
इतिहास
गावातील प्रतिष्ठित मंडळींनी सांगितल्याप्रमाणे, आर्णी या गावाला १५० वर्षाचा वारसा आहे. पुर्वी, हे गाव निजामाच्या संस्थानात होते पण भारत स्वातंत्र झाल्यावर सर्व संस्थाने खालसा झाल्यानंतर आर्णी हे गाव महाराष्ट्रात आले. १९३२ पूर्वी आर्णीला "उलटी पांढरी" म्हणत, कारण गावातील बरीच मंडळी गरीबा पासून श्रीमंत तर श्रीमंता पासून गरीब झाली. पण १९३२ साली इंग्रजानी व गावातील प्रतिष्ठित मंडळींनी अरुणावती नदीच्या नावावरून आर्णी नामकरण करण्यात आले.
थोड आर्णी बद्दल
आर्णी हे गाव अरुणावातीच्या काठी वसलेले छोटे गाव होते कालांतराने गावाचा कायापालट झाला. नदी काठी सूफी संत बाबा कंबलपोषचा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील आरती दर्ग्यात ऐकु यावी तर दर्ग्यातील प्रार्थना मंदिरात ऐकु यावी हा रोजचा नित्यक्रम, गावाततही हिंदू मुस्लिम बांधव गुन्या-गोविंदानि राहतात. सूफी संत बाबा कंबलपोषच्या नावाणी दरवर्षी फेब्रुवारीत एका यात्रेचे आयोजन केले जाते, साधारण ही यात्रा ५ फेब्रुवारीला सुरू होऊन १० फेब्रुवारी पर्यंत संपते. ही यात्रा यवतमाळ जिल्यात फार मोठी यात्रा समजली जाते. या यात्रे साठी हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई मोठ्या संख्येने गर्दी करतात.
संदर्भ