आत्माराम नाटेकर

आत्माराम विठ्ठल नाटेकर (जन्म : ७ ऑगस्ट १९६४) हे एक मराठी पत्रकार आहेत. १५ एप्रिल १९८९पासून ते दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्रात काम करीत आहेत.

त्यांनी यापूर्वी दैनिक शिवनेरी आणि दैनिक सामना या वृत्तपत्रांतही नोकरी केली होती. त्यांचे दैनिक लोकसत्तातील चतुरंग, लोकरंग, ठाणे वृत्तान्त, रविवार वृत्तान्त या पुरवण्यांमध्ये विविध विषयांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

डोंबिवली लोकसेवा समिती सामाजिक संस्थेचे ते ११ वर्षे अध्यक्ष होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचे आजीव सदस्य असून सन १९९३ ते १९९७ या काळात संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते.

आत्माराम नाटेकर यांची प्रकाशित पुस्तके

  • गावपळण
  • माझी शिदोरी

आत्माराम नाटेकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • अखिल भारतीय लोकसेवा समितीचा राज्यस्तरीय जीवनरक्षक पुरस्कार (सन २००५)
  • सामाजिक कार्यासाठीचा आणि उत्तम पत्रकारितेसाठीचा समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कार (सन २०११)
  • गुरूर्ब्रह्मा पुरस्कार (सन २००५)
  • भारतीय दलित साहित्य अकादमीची महात्मा जोतिबा फुले फेलोशिप (सन २००७)
  • न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेचा पुरस्कार (सन २००८)
  • डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानचा डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार (सन २००९)
  • शिवसह्याद्री सांप्रदायिक सेवा मंडळाचा गौरव पुरस्कार (सन २००४)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!