अशोक खळे

अशोक खळे (जन्म : २३ मार्च, इ.स. १९५५ - - ११ नोव्हेंबर, इ.स. २०१७) हे सायकल चालवणारे तसेच 'घाटांचा राजा' म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक सायकलपटू होते. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकात त्यांनी स्पर्धात्मक सायकलिंगला सुरुवात केली.

कामगिरी

महाराष्ट्र राज्य सायकलिंग चॅम्पियनशिप, सातारा-मालेगाव-सातारा रेस, मेडन सायकल रेस, बरोडा बॉम्बे सायकल रेस, या सारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अशोक खळे यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. इ.स. १९७९ साली हैदराबादमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. इ.स. १९८३ साली इटली येथे पार पडलेल्या '३८व्या ग्रान प्री मिओ डेल्ला लिबरेझिन' आणि '८०व्या जिरो डेल्ले रेगिओनि रोड बायसिकल रेस'मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. इ.स. १९८६ साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये ते महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी होते.[]

पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार (इ.स. १९८०)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ प्रशांत ननावरे (१७ डिसेंबर २०१७). "अशोक खळे : सायकल चालवणारा 'घाटाचा राजा' घाटातच हरपला!". बीबीसी मराठी. २५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!