अलकनंदा ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व गंगेच्या दोन मूळनद्यांपैकी एक आहे (भागीरथी नदी ही दुसरी). अलकनंदा उत्तरखंडच्या उत्तर भागातील तिबेटच्या सीमेजवळील एक पर्वतशिखरामध्ये उगम पावते. ती चमोली, रुद्रप्रयाग व पौडी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते.
चार धाम यात्रेचा भाग असलेले बद्रीनाथ हे गाव अलकनंदाच्या काठावर वसले आहे.
पंचप्रयाग
गढवाल प्रदेशामधील अनेक नद्या अलकनंदाला येऊन मिळतात. ह्या संगमांच्या स्थानांना पंचप्रयाग असे म्हणले जाते.
- विष्णुप्रयाग, जेथे अलकनंदाला धौलीगंगा नदी येऊन मिळते.
- नंदप्रयाग, जेथे अलकनंदाला नंदाकिनी नदी येऊन मिळते.
- कर्णप्रयाग, जेथे अलकनंदाला पिंडर नदी येऊन मिळते.
- रुद्रप्रयाग, जेथे अलकनंदाला मंदाकिनी नदी येऊन मिळते.
- देवप्रयाग, जेथे अलकनंदाला भागीरथी नदी येऊन मिळते व गंगा निर्माण होते.
काठावरील गावे
नदीच्या उगमापासून ते मुखापर्यंत खालील गावे अलकनंदाच्या काठांवर वसली आहेत. ह्यांमधील बहुतेक गावे लोकप्रिय पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे आहेत: बद्रीनाथ, विष्णुप्रयाग, जोशीमठ, चमोली गोपेश्वर, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर व देवप्रयाग.