अपोलो १२

अपोलो १२चा बिल्ला

अपोलो १२ हे अमेरिकेचे अंतरिक्षयान होते. अपोलो मोहीमेतील १२वे आणि चंद्रावर उतरलेले हे दुसरे मानवी अंतरिक्षयान होते. १४ नोव्हेंबर, १९६९ला याचे प्रक्षेपण झाले व १० दिवसांनी ते पृथ्वीवर परतले. या दरम्यान ७९ तास हे यान चंद्राभोवती घिरट्या घालत होते व त्यातील ३१ तास कमांडर पीट कॉन्राड आणि अॅलन बीन हे चंद्रावर होते तर रिचर्ड गॉर्डन हा चंद्रप्रदक्षिणेत होता.

या मोहीमे दरम्यान कॉन्राड आणि बीन यांनी चंद्रभूमीवर अनेक प्रयोग केले. त्यांनी चंद्रावरून ३३.४५ किलो मृदा आणि खडक परत आणले.

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!