अंधारी नदी ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अभयारण्यातली नदी आहे.
अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हणले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूलमार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे.